जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

84

एटापल्ली:- संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्राचार्य श्री विनय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शेख सर,सिडाम सर,रामटेके सर,वैरागडे सर ,घरामी सर, सुनील येनगंटीवार,प्रवीण चन्नावार, मनोज इरले,अश्विनी म्याडम,अंकुश संतोषवार,यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत आणि संविधान वर आपले विचार मांडले.कला शिक्षक श्री मनोज सर यांनी सुदंर गीत सादर केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन मनोज बन्सोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.छाया श्रीरामे यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱी आणि मोठ्या संख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.