Home गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली आणि आत्मा, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेडनेट...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली आणि आत्मा, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेडनेट उभारणी नियोजित

169

गडचिरोली, (जिमाका) दि.30 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दर्जेदार भाजीपाला विकसीत करण्याकरीता अनुसूचित जमातीच्या 1 शेतकरी बचत गटाकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मार्गदर्शक सुचनेप्रमाणे शेडनेट उभारणी नियोजित आहे. तरी गडचिरोली, कुरखेडा, कोरची, आरमोरी, वडसा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यातील इच्छुक अनु.जमातीच्या बचत गटांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे 1)शेतकरी बचत गटांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 2) ग्रामसभेचा ठराव. 3) जमिन धारणेचा 7/12 चा दाखला, 8- अ चा उतारा व नकाशा 4) आधार कार्डची प्रत 5) बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत. सात दिवसाच्या आत प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली सोनापूर, गडचिरोली या कार्यालयात सादर करावे. असे प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

Don`t copy text!