एकच मिशन….. जुनी पेंशन…. भव्य पेंशन संगर्षं सभेत सहभागी व्हा! आमदार नागो गाणार यांचे आव्हान

46

नागपूर :- महाराष्ट्र शासनाने राज्याचे मंत्री व आमदारांची पाच सहा वर्ष सेवा विचारात घेऊन पेंशन कायम ठेवली. परंतु वयाच्या 58 व 60 वर्षपर्यंत सेवा असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानची जुनी पेंशन योजना बंद करून डिसीपीएस/एनपीएस ही फसवी योजना त्यांचेवर लादली शासनाच्या या अन्यायी धोरणाविरुद्ध जुनी पेंनशन संघर्ष समनव्य समितीने त्रिस्तरीय व्यापक लढा सुरू केला आहे.जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र शिक्षक परिषदेसह अन्य 65 संघटना सहभागी आहे.आंदोलनचा पहिला टप्पा दिनांक 22 नोव्हेंबर पासून पेंशन संघर्ष यात्रेद्वारा सुरू झाला आहे.पेंशन संगर्षं यात्रेद्वारा सुरू झाला आहे.पेंशन संघर्ष यात्रेद्वारा सुरू झालेला आहे.पेंशन संघर्ष यात्रा राज्यातील 34 जिल्ह्यातुन जनजागृती करीत दिनांक7/12/2021ला नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे प्रवेश करीत आहे.या निमित्ताने दिनांक 8/12/2021 ला आशीर्वाद मंगल कार्यालय उमरेड जिल्हा नागपूर येथे सकाळी10 वाजता आयोजित केले आहे. या सभेला शिक्षक कर्मचारी यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन आपल्या संघठित शक्तीचा परिचय शासनास करून द्यावा असे आव्हान आमदार तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक परिषद नागो गाणार यांनी केले आहे.