हिरापूर :- येथे अंगवाडीचे लोकार्पण व साहित्य वाटप
सावली ( प्रतिनिधी )
येथूनच जवड असलेल्या हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा निधी अंतर्गत ग्रामपंचायत हिरापूरच्या अनुषंगाने अंगणवाडी बांधकाम करण्यात आले सदर अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा हिरापूर येथे पार पडला यावेडी क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य मनीषा चिमुरकर, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, गावच्या प्रथम नागरिक प्रीती नितीन गोहणे, उपसरपंच शरद कंनाके, प्राथमिक आरोग्य केंद्र बोथली येथील डॉ खराटे, cho नागरे, भुरसे बाबूजी, ग्रामपंचायत सदस्य नीता मुंघाटे,माधुरी आत्राम, यशोदा देशमुख, प्रमोद भोपये, वामन भोपये, सरिता भोयर, उपस्थित होते
दरम्यान अंगणवाडीला वेगवेगडे साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले त्यात प्रामुख्याने तपासणी टेबल,गॅस सिलेंडर, सॅनिटरी नॅपकिन, कुपोषित बालकांना मटकी, हरभरा, गूळ, शेंगदाणे, मुंग, उडीद, देण्यात आले
अंगणवाडीला भिन्न भिन्न साहित्य दिल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे सदर लोकपयोगी कार्यामुळे ग्रामपंचायत हिरापूरचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे