तोडसा :- येथील प.स.एटापल्ली जि प गडचिरोली अंतर्गत पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1 तोडसा येथे 45 लाख रुपये लागत नविन ईमारत बांधकाम पुर्ण झाले असल्याने लोकार्पण समारोह सोहळा मा युधिष्ठिर विस्वास बांधकाम सभापती जि प गडचिरोली, यांच्या शुभहस्ते करण्यात आले
पंचायत समीती एटापल्ली च्या सभागृहात बांधकाम, कृषी व महीला व बालकल्याण विभागाची आढावा बैठक पार पडली.विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली,नवीन अंगणवाडी बांधकाम, पोषण आहार,कुषोषण विविध विषयांवर आढावा घेतला,तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवांची माहीती घेवुन ,मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मा. युधिष्ठिरजी विश्वास बांधकाम सभापति जि.प.गडचिरोली, .प्रा. रमेश बारसागडे कृषी सभापती,रोषनीताई पारधी महिला व बालकल्याण सभापती जि प गडचिरोली,बबीता मडावी ताई सभापती पं.स. एटापल्ली,बेबीताई लेकामी माजी सभापती पं.स. एटापल्ली, ज्ञानकुमारी कौशी जि.प.सदस्या,कल्पना प्रशांत आत्राम जि. प. सदस्या,ज्ञानेश्वर गव्हाणे संवर्ग विकास अधीकारी प स एटापल्ली,प्रशांत आत्राम सरपंच ग्रामपंचायत तोडसा,मादशेट्टीवार मॅडम बालविकास प्रकल्प अधीकारी एटापल्ली,सुनील पारधी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा,तसेच पंचायत समितीचे जि प उपविभागीय बांधकाम अधीकारी जुवारे,जेई जवणे,व ईतर विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.






