आष्टी-चामोर्शी :- मार्गावरील आष्टी पासून 3 किलोमीटर असलेल्या उमरी जवळ ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सात डिसेंबर बुधवारला दुपारी साडेतीन च्या सुमारास गडचिरोली वरूनआष्टी कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक AP 16 TY 6822 आष्टी कडून कोनसरी कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 33 Y 4295 ला जबर धडक दिली यात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले.
मृतकात सूरज बालाजी कुसनाके वय 35 रा मुधोली ता चामोर्शी जि गडचिरोली ललिता नितेश कुसनाके वय 25वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली रितिका नितेश कुसनाके वय 4 वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली यांचा समावेश आहे.
यामध्ये ललिता कुसनाके व रितिका ही आई आणि मुलगी असून सूरज हा ललिता कुसनाके यांचा दिर आहे.
सूरज कुसनाके आपल्या वहिनी व पुतणीला गोंडपीपरी येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. उपचार घेऊन परतत असताना काळाने कुसनाके कुटूंबीयावर घाला घातला.हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकी 4 वर्षोय रितिका चा मेंदू अक्षरशः बाहेर निघाला तर दुचाकी जळून खाक झाली. कुसनाके कुटूंबियावर घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे मुधोली रिठ वासीयांवर शोककळा पसरली आहे.







