घोट-चामोर्शी :- मार्गावर काळी पिवळी ट्रॅक्स आणि दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी गडचिरोली-चामोर्शी तालुक्यासाठी बुधवार हा घातवार ठरला.एकाच दिवशी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवार संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी घोट-चामोर्शी मार्गावरील घोट पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलगट्टा वळणाजवळील पुलाजवळ काळी पिवळी ट्रॅक्स व दुचाकीच्या धडकेत पती पत्नी जागीच ठार झाले.रवी मल्लीक वय 50 वर्ष रा श्यामनगर ता चामोर्शी जि गडचिरोली सुप्रिया रवी मल्लीक 45 वर्ष रा श्यामनगर ता चामोर्शी जि गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे तर राजा मालाकर वय 18 वर्ष रा श्यामनगर व बाबुराव मानकर वय 65 वर्ष रा घोट अशी जखमींची नावे आहेत.
MH 33 -784 या क्रमांकाची काळी पिवळी ट्रॅक्स चामोर्शी वरून घोटकडे जात असताना श्यामनगर वरून चामोर्शी कडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक MH33 H 8658 ला जोरदार धडक दिली.यात पती पत्नी चा दुर्दैवी मृत्यू झाला.तर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तत्पूर्वी चामोर्शी तालुक्यातील उमरी जवळ साडे तीन च्या सुमारास झालेय ट्रक व दुचाकीच्या अपघातात तिघे जण ठार झाले.एकाच दिवशी झालेल्या या दोन अपघातामध्ये पाच जण ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.