गडचिरोली, (जिमाका) दि.10 :- राज्य सरकारच्यावतीने पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, पशुपालक व शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर योजनांकरीता अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत ही 18 डिसेंबर 2021 असल्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त इच्छुकांनी अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत सर्वसाधारण प्रवर्ग,अनुसूचित जाती प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्ग करीता दुधाळ जनावरांचा गट वाटप शेळीगट वाटप व कुक्कुट पक्षीगृह बांधकाम, तलंगगट वाटप या योजना सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येणार आहे. सदर योजनांकरीता अर्ज व ईतर अनुषंगीक माहिती करीता http://ah.mahabms.com या संकेत स्थळावर भेट द्यावी ऑन्डराईड मोबाईल धारक AH-MAMABMS या ॲप्लीकेशन द्वारे सुध्दा अर्ज सादर करु शकतात. मोबाईल ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 असा आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 वर संपर्क साधावा. काही अडचणी आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना व पशुधन विकार अधिकारी, (विस्तार) पंचायत समिती, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद , गडचिरोली अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.






