गडचिरोली,(जिमाका)दि.13 :- महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यापक स्वरुपात काम करावयाचे असेल व शेवटच्या महिलेपर्यंत पोहचून तिचे आयुष्य सुखी व समाधानी करावयाचे असेल तर तातडीने/जलद न्याय मिळणे आवश्यक आहे त्याकरीता स्थानिक पातळीवरील पिडीतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवरील सरकारी अंमलबजावणी यंत्रणांची मदत तात्काळ घेणे सोपे व्हावे आणि पीडीतेला लवकरात लवकर न्याय मिळावा. याकरीता मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट राज्य, यांनी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय भाषणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची विभागीय स्तरावर कार्यालये स्थापन करणेबाबत केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची विभागीय स्तरावर कार्यालये स्थापन करण्यात आलेली आहे.
सदर विभागीय कार्यालयाच्या परिक्षेत्रातील समस्या घेऊन विभागीय कार्यालयात आलेल्या महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने महिलेच्या ईच्छेनुसार तज्ञ समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाईल किंवा इतर आवश्यक मदत मिळण्याकरीता सहाय्य करण्यात येईल. पीडीत महिलांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग विभागीय कार्यालय, नागपुर व्दारा विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास नागपूर यांचे कार्यालय, शासकीय मुलांचे बालगृह, पाटणकर चौक, नारी रोड, नागपुर – 26 या पत्यावर किंवा ddy.commissionernagpur@rediffmail.com या ईमेल वर आपल्या तक्रारी पाठवाव्या असे असे आवाहन विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास नागपूर विभाग नागपूर यांनी केलेले आहे.