पेरमिली:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेरमिली येथे जिल्हा वार्षिक योजनेतून एक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण झाल्याने दिनांक 15/12/2021ला जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पेरमिली येथील सरपंच श्रीमती किरणताई नैताम , श्री.प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच, श्री.निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, श्री.आसिफखान पठाण शा.व्य.स., केंद्रप्रमुख भराडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.धर्माजी चांदेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री कविश्वर चंदनखेडे, श्री गजानन मडावी, लक्ष्मण कुळमेथे, श्री शिवा गर्गम, राजू बोमनवार, श्री मनोज मेश्राम ग्रामसेवक, तुळशिराम चंदनखेडे, श्रीमती वंदना दहागावकर उपस्थित होते. उद्घाटक महोदय मा. अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थितांना व विद्यार्थ्याना सर्वांचे समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.