स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

183

गडचिरोली,(जिमाका)दि.20:- महाराष्ट्र शासन याद्वारे राज्यातील पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक व पोट -निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, दि. 21 डिसेंबर 2021 रोजी पुढील अनुसूचित दर्शविलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदार संघात मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.