ऍड.संघरत्न कुंभारे यांना एटापल्ली वासीयांनी दिली भावपूर्ण श्रद्धांजली
गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थितीती
एटापल्ली:- एटापल्ली येथून जवळच जीवनगट्टा गावातून तसेच एटापल्ली तालुक्यातून एकमेव असलेले ऍड. संघरत्न कुंभारे यांची एटापल्ली येथील बस स्टॉप जवळ श्रद्धांजली कार्यक्रम अर्पण करण्यात आली.
या शोक सभेला उपस्थित गावातील नागरिक तसेच जीवनगट्टा येथील नागरिक गावातील युवा वर्ग उपस्थित होते.
ऍड.संगरत्न कुंभारे हे अहेरी येतील न्यायालयात कार्यरत असणारे तालुक्यातील पहिले वकील व त्यांनी न्यायाधीशचे परीक्षा उत्तीर्ण झालेले ऍड. कुंभारे यांचं दिनांक 10/01/2021 रोजी कोरोना मुळे अकाली दुःखद निधन झाले. दुर्दैवाने आप्त स्वकीयांना शवाचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही अलीकडेच सर्वांशी संपर्कात आले होते. ते स्मिय स्वभावाचे सर्वांचे मित्र असल्याने अचानक निधनाची बातमी आल्याने परिसरात शोककळा पसरली होती. अनेक संस्था व संघटना कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .






