विजेच्या सतत च्या लपंडाव व शासकीय कर्मचाऱ्यांच्या अप डाऊन कंटाळून
कोटगुल परिसराती 45 गावचे लोक प्रतिनिधी व नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
कोरची(गडचिरोली) एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सुरू असताना मागील दहा वर्षापासून मंजूर असलेल्या 33 केवी वीज वितरण कंपनीचा सब सेंटरचे काम न झाल्याने महिन्यातील वीस दिवस परिसरातील नागरिकांना अंधारात काढावे लागत असून विविध विभागाचे एकही कर्मचारी मुख्यालय हजर राहत
नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी कोरची तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिलेला आहे
1) कोटगुल येथे BSNL 4G सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी.
2) प्राथमिक आरोग्य केंद्र असुन देखील रुग्णांना सेवा मिळत नसल्याने 50 किमी.अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यासाठी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, त्यासाठी कोटगुल येथे ग्रामीण रुग्णालय उपलब्ध करुण देण्यात यावी.
3) नरेगा अंतर्गत पुष्कळ गावात कामा झालेल्या आहेत, पण फेब्रुवारी ते मार्चपर्यंतचे मजूरी अद्याप मिळाली नसल्याने सदर मजुरी मजूरांच्या बँक खात्यात करण्यात यावी.
व इतर मुद्द्यांचा बाबतीत निवेदन देण्यात आली.