संस्था सचिव मा.सुनीलभाऊ पोरेड्डीवार यांचा 60 वा वाढदिवस आनंदात साजरा :-
गडचिरोली:- दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोज रविवारला संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा संजीवनी विद्यालय,नवेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था सचिव मा.सुनीलभाऊ पोरेड्डीवार यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रम विवेकानंद नगर गडचिरोली येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृध्दाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सुनीलभाऊ पोरेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था अध्यक्ष मा.डी. डी. सोनटक्के यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले तसेच संजीवनी परिवारातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती मा.सुनीलभाऊ पोरेड्डीवार, संस्था अध्यक्ष मा.डी. डी. सोनटक्के,संस्था उपाध्यक्षा मा.शकुंतला ताई पोरेड्डीवार,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.अजय लोंढे सर,मा.किशोर भाऊ पाचभाई, मा.प्रवीण चनांवार, वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापिका मा.संध्याताई पोरेड्डीवार, संजीवनी शाळेचे दोन्ही मुख्याध्यापक मा.जे.के.भैसारे,मा.एन.के.चुटे,मा.
उषाताई सोनटक्के,डॉ.समीक्षा पोरेड्डीवार, विभाताई बुटले मॅडम,डॉ.प्रतिभा वैरागडे,संजीवनी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,वृध्दाश्रमातील वृद्ध आदी उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष तसेच सत्कारमूर्ती मा.सुनीलभाऊ पोरेड्डीवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्ही.ए. ठाकरे सर,तर आभार मुख्याध्यापक श्री. चुटे सर यांनी मानले.