आम आदमी पार्टीचे मॅपिंग शिबिर चामोर्शी येथे संपन्न
चामोर्शी (गडचिरोली) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने २०२४ चे लोकसभा मिशन वर लक्ष केंद्रित करीत जिल्हाभरात आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक यांनी आपली कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. आज त्याच अनुषंगाने चामोर्शी येथे कार्यकर्ता मॅपिंग शिबिर आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे चामोर्शी तालुका कार्यकर्ता मॅपिंग शिबिर साधुबाबा हनुमान मंदिर मूल रोड चामोर्शी येथे आयोजित करण्यात आले.दरम्यान कार्यकर्त्यांना तालुक्यातील प्रत्येक गावा-गावात जाऊन पार्टीच्या वतीने बैठका घेत कार्यकर्ते जोडणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
मॅपिंग शिबिर स्थळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, सुखसागर झाडे चामोर्शी तालुका संयोजक,सूरज बारसागडे, प्रफुल्ल सातपूते, महेश दुधबळे, पल्लवी कोटांगले, आदर्श साखरे, सुखदेव बोदलकर, बंडूजी कुडवे, छकुली गजबे, इत्यादी कार्यकर्ता हजर होते.