श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरीचे वतीने वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न

112

श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरीचे वतीने वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न

आरमोरी: श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरीचे वतीने दरवर्षी प्रमाणे वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा दोन दिवसीय पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दि.16/01/2021 रोज शनिवाला सकाळी 10 वाजता घटस्थापना ह.भ.प.श्री क्षीरसागर महाराज उराडी यांचे हस्ते सायंकाळी 6 वाजता हरिपाठाचा कार्यक्रम व रात्रौ 8 वाजता भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला .तसेच दुसऱ्या दिवशी दि.17/01/2021रोज रविवाला सकाळी 8 वाजता वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा पालखी सोहळा पार पडला. सकाळी 11वाजता श्रीमती वेणूताई प्रभाकरराव तोडेवार गडचिरोली यांच्या हस्ते नवीन सभामंडपाचे उदघाटन करण्यात आले.त्यानंतर लगेच ह.भ.प.क्षिरसागर महाराज उराडी यांच्या हस्ते सभामंडपाचे वास्तुपूजन व होमहवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.मंदिर व सभागृहाच्या बांधकाम व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रम निस्वार्थने कार्यक्रमात पुढाकार घेत असल्याबद्दल श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समितीचे संचालक श्री चंद्रकांत पोरेड्डीवार गडचिरोली यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. व नंतर ह.भ.प.क्षिरसागर महाराज यांचे प्रवचन व गोपाळ काला व महाप्रसादाचा कार्यक्रमानी दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला यासाठी दूरवरून भक्तमंडळी आलेली होती.