रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांनी दिले निवेदन

91

रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांनी दिले निवेदन

एटापल्ली:आविस नेते तथा माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना पंदेवाही येथील सुशिक्षित बेरोजगार महिला यांनी एटापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे आविस नेते तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन तालुक्यात अतिवृष्टी मूळे शेती संपूर्ण नष्ट झाल्यामुळे परिवार रस्त्यावर आले आहे करिता अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान भरपाई देऊन हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावे याकरिता महिलांनी निवेदन देऊन चर्चा केले या वेळेस आविस सल्लागार शंकरजी दासरवार, माजी जि प सदस्य कारूजी रापंजी,संजयभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, रमेश तोरे, दिलीप गंजीवार, विजय कुसनाके,जुलेख शेख सह कार्यकर्ते उपस्थित होते.