जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

124

जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी म्हणून येथे स्वतःला ओळखा व करिअर निवडा या विषयावर नुकतेच मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले.प्राचार्य विनय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून वकील शेख यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज इरले यांनी, तर आभार प्रदर्शन रामटेके सर यांनी केले.कार्यक्रमाला शुभाष वैरागडे उपस्थित होते. कार्यक्रमास मोठया संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.