राष्ट्रीय महामार्ग आरमोरी ते गडचिरोली समस्याच्या विळख्यात–लवकरात लवकर दुरुस्ती करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे तीव्र आंदोलन असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे निखिलभाऊ धार्मिक यांनी दिला आहे
गडचिरोली:-आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग हा अनेक राज्यासाठी जवळचा पडत असल्याने या मार्गावर जड ओव्हर लोड वाहतूक व अन्य कोणत्याही वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर केला जातो पण यामार्गावर आरमोरी पासून थोड्या अंतरावर ठाणेगाव, डोंगरगाव या ठिकाणी अनेक मोठं मोठे खड्डे पडल्याने मार्ग काढताना दुचाकी वाहन म्हणा किंवा चारचाकी वाहन धारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे अशातच आता एक दोनदा पूर आल्याने काही ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे खराब होऊन गिट्टी वर आलेली आहे त्यामुळे मार्ग काढताना हे खड्डेमय रस्ते चुकवताना कधी जीवावर बेतेल याचाही काहीच भरोसा राहिला नाही याचं मार्गावरून नागपूर किंवा इतर ठिकाणी जावयाचे झाल्यास आपल्या जिल्ह्यातील अधिकारी आमदार खासदार हे जात असतात तरी सुद्धा या खड्डेमय मार्गाकडे स्थानिक पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्या दुर्लक्षित पणामुळे एखाद्याचा जीव सुध्दा जाऊ शकतो परंतु पूर्णपणे लोकनियुक्त पदाधिकारी यांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे ठाणेगाव-डोंगरगाव येथील नागरिकांत तसेच या मार्गावर येजा करणाऱ्या नागरिका मध्ये प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या प्रति रोष दिसुन येत असून लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे निखीलभाऊ धार्मिक तसेच डोंगरगाव-ठाणेगाव येथील नागरिकांनी दिलेला आहे







