गडचिरोली :- आज दिनांक 4/10/2022 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे “वन्यजीव सप्ताह(1ऑक्टोबर ते 7ऑक्टोबर 2022)” निमित्ताने विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री विनय चव्हाण सर यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांचे महत्व विषद केले आणि वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या भारत सरकार शिष्यवृत्ती बद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा.गणेश आत्राम यांनी प्रास्ताविक आणि सूत्र संचालन केले. सदर कार्यक्रमाला प्रा. कु. प्रतिमा करमरकर, कीर्ती डोंगरे आणि कु.अश्विनी हरणखेडे ह्या उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.