गडचिरोली शहरातील फुले वार्डातील पक्षी नष्ट करताना बाहेरील नागरिक, पत्रकारांनी प्रवेश करु नये
गडचिरोली,(जिमाका)दि.20 : गडचिरोली शहरातील फुले वार्डात बर्ड फ्ल्यु संसर्गामुळे संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्या ठिकाणी संक्रमित पक्षी व 1 किमी. त्रिज्येतील कुक्कुटपालनातील पक्षी यांना नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्या ठिकाणी बाहेरील नागरीक तसेच पत्रकार यांना उपस्थित राहु नये म्हणून आवाहन करण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी छायाचित्र , व्हीडीओ घेणेसाठी मज्जावही करण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खबरदारीची उपाययोजना म्हणून सदर आवाहन करण्यात आले आहे.






