राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
आष्टी:- आज दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोज मंगळवारला गटसाधन केंद्र मुलचेरा व राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) यांच्या सुयक्त विधमाने राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली येथे महाकॅरिअर पोर्टल बाबत कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली .
व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण बोरकुटे मुख्याध्यापक राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून श्री विलास श्रीकोंडावार गटसमन्वयक ,अशफाक शेख तालुका अविरत समन्वयक ,विनायक लिंगायत विषय साधन व्यक्ती ,राजेश नागपूरकर विशेष तज्ञ संजयकुमार मोरघडे संसाधन शिक्षक ,मेघशाम भोयर व्यवसाय मार्गदर्शन सुलभक ,रथीन्द्र सरकार पाळीप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघशाम भोयर व्यवसाय मार्गदर्शक सुलभक यांनी केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपली दिशा निश्चित करून आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडी बाबत मार्गदर्शन केले .मुलचेरा तालुका अविरत समन्वयक अशफाक शेख यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून (PPT)दाखवून महा कॅरिअर पोर्टलवर लागिन कशी करायची नंतर व्यवसाय कसा निवडायचा आवडीनुसार वेगवेगळे कालेज कसे निवडायचे त्यांच्या फी बाबत माहिती अशा अनेक कोर्सेस बाबत व रोजगाराबाबत माहिती पोर्टलवर कशी शोधावी व आपले कॅरिअर कसे निश्चित करावे याबाबत सविस्तर माहिती दिली
तसेच विलास श्रीकोंडावार गटसमन्वयक व राजेश नागपूरकर विशेष तज्ञ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विनायक लिंगायत विषय साधन व्यक्ती यांनी इंग्रजीचे Read To Me app कसे वापरावे व इंग्रजीचा कसा अभ्यास करावा हे सांगितले Read To Me App डाऊन लोड केल्यानंतर प्रथम आपला वर्ग निवडा व नंतर आपला विषय निवडायचा व नंतर या माध्यमाने कसे इंग्रजी स्वयअध्यापन करावयाचे हे विद्यार्थ्यांना समजवून सांगितले .
मुख्याध्यापक श्री नारायण बोरकुटे यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आपल्या आवडीतून व्यवसाय निवडा व त्यामध्ये खूप मेहनत घ्या ,चिकाटीने जिद्दीने पुढे जा व आपले भविष्य उज्वल बनवा असे सागितले तसेच Wherever a will there is a way या उक्ती प्रमाणे इच्छा तिथे मार्ग नकीच मिळत असतो म्हणून कोणत्यही आवडीच्या कार्यात स्व:तला झोकून द्या .खूप मेहनत घ्या जीवनात पुढे जाल तुम्ही खूप आनंदी राहाल असे सांगितले
या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र लाकडे यांनी केले तर आभार रथीन्द्र सरकार यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्रसंघाचे पदाधिकारी ,विद्यार्थ्याती यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला वर्ग ९ वा व वर्ग १० वीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.