वैनगंगा नदीत स्कारपीओ वाहन कोसळले चालकाचा मृत्यू
गडचिरोली-
आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून स्कारपीओ वाहन उलटल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबर सायंकाळी पाऊने सहाच्या सुमारास घडली.
गोंडपीपरी कडून आष्टीकडे येणारे स्कार पीओ वाहन क्रमांक MH 20 DV 3711 वैनगंगा नदीच्या पुलावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन नदीत कोसळले.यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.हे वाहन नेमके कुणाच्या मालकीचे हे कळू शकले नसून मृत वाहनचालकाचे नाव अद्यापपर्यंत कळू शकले नाही.
या गाडीत चालक हा एकटाच होता.घटनेची माहिती कळताच आष्टी व गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे.







