गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळाची सभा दिनांक 16.10.2022 रोज रविवारला गानली समाज सभागृहात पार पडली. श्री अशोकराव चन्नावार गानली समाजाचे अध्यक्ष म्हणून सन 2013 पासुन ते 2022 पर्यंत कार्यरत होते त्यांनी वरील कालावधी मध्ये आपले कार्य यशस्वी रीतीने पार पाडले. परंतु गेल्या 2 वर्षापासून त्यांची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता. आजच्या बैठकीमध्ये त्यांचा राजीनामा कार्यकारिणीची इच्छा नसून सुध्दा त्यांच्या आग्रहखातिर मंजूर करण्यात आला. तसेच नवनियुक्त अध्यक्ष म्हणून मा. श्री प्रकाश भाऊ तोडेवार माजी सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष यांचे समाजातर्फे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.







