दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी चंद्रपूर शहर गाणली समाजाच्या वतीने कोजागिरी व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात 2022 मधील 10 वी आणि 12 वी च्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात 10 वीच्या परीक्षेत 91 % गुण घेऊन घवघवीत यश प्राप्त करणारा विद्यार्थी अर्णव राजेंद्र वरगंटीवार हा अपंग असून तो सत्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही, म्हणून त्याच्या पालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अर्णव ला प्रोत्साहित व त्याचे कौतुक करण्यासाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी चंद्रपूर शहर गाणली समाजाच्या वतीने त्यांचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन पालकासह त्याचा सत्कार करून त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
अर्णव हा आपल्या समाजाचा एक घटक असून त्याला अगदी वयाच्या 15-16 व्या महिन्यातच अपंगत्व आले,आणि तेव्हापासून तो आणि त्याच्या पालकाचा संघर्ष सुरू झाला,अगदी बालपणीच त्याला आलेलं अपंगत्व हे त्याच्या पालकांसाठी एक आव्हानच होत,अगदी बालवयात सुरू झालेला त्याचा संघर्ष आणि त्याच्यात असलेली जिद्द ,हे त्याच्या बोलण्यातून दिसत होतं,तो म्हणाला मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे,एवढं असूनही तो Confidently बोलत होता,त्याच्यासाठी आतापर्यंत जवळपास 50 लाख लागले असेल,आणि आम्ही अजूनही हार मानलेली नाही आणि मानणारही नाही असं त्याच्या पालकांनी बोलून दाखवल.त्याच्या निदानासाठी आतापर्यंत चंद्रपूर,सिकंदराबाद, भुवनेश्वर ,रामदेव बाबा ,होमिओपॅथी अश्या बऱ्याच ठिकाणी त्याचे पालक त्याला घेऊन फिरले व अजूनही त्याचेवर इलाज सुरूच आहे,आणि अश्या या परिस्थितीत तो अपंग असूनसुद्धा रात्री उशिरापर्यंत जागून स्वतः अभ्यास करून त्याने हे यश मिळविले आहे,खरचं त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहेत,त्यांच्याबाबतीत सांगण्यासारखे अजून बरेच काही आहे,परंतु ……..!!
हे सर्व आम्ही त्यांच्याकडे गेलो असता,त्यांच्या पालकांकडून माहिती मिळाली, खरचं त्या त्याच्या आईवडिलांचे सुद्धा मनापासुन अभिनंदन
पुनश्च अर्णव तुला खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा