जिल्हा परिषद गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात आज सापडल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

558

जिल्हा परिषद गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजू देसाई हा एसीबीच्या जाळ्यात आज सापडल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

गडचिरोली:- जिल्हा परिषद गडचिरोली येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे राजू महादेव देसाई, वरिष्ठ लिपिक वर्ग-3 ,कार्यालय शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जिल्हा परिषद गडचिरोली ता. जि. गडचिरोली यांना 3000/- (तीन हजार रुपये) रुपये लाच स्वीकारताना अँटी करपशन ब्युरो गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात आज पकडले आहे. जिल्हा परिषद गडचिरोली येथील वरिष्ठ लिपिक पदाच्या कर्मचाऱ्या वर अँटी करपशन ब्युरोने केलेल्या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहे. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या ग्याजुटीच्या रकमेचे धनादेश तयार करून देण्याकरिता शिक्षणाधिकारी( माध्यमिक) कार्यालय, जिल्हा परिषद गडचिरोली येथील लिपिक राजू महादेव देसाई यांनी 3,000/- रुपये लाचेची मागणी केली . तक्रारदार यांचं लाचलूचपत प्रतिबंधक विभाग , कार्यालय गडचिरोली येते तक्रार नोंदवली. लाचलुपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक यशवंत राऊत यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरीत्या शहानिशा करून योजनाबद्धरित्या दिनांक 20/01/2021 रोजी सापळा रचला आणि आज रंगेहाथ पकडले .
वरिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मिडणाऱ्या ग्याजुटीच्या रकमेचे धनादेश तयार करून देण्याकरिता 3,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारताना लाचलुपतच प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहाथ पकडले . राजू महादेव देसाई यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.,
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, व अपर पोलीस अधीक्षक राजेश दुईलवार , मिलिंद तोतरे, अँटी करपशन ब्युरो नागपूर, सुरेंद्र गरड ,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी यशवंत राऊत, पोलीस निरीक्षक, सफी मोरेश्वर लाकडे , पोहवा प्रमोद ढोरे , पोहवा नथू धोटे, नापोशी सतीश कत्तीवार, नापोशी सुधाकर दांडिकवार , नापोशी देवेंद्र लोंबळे ,पोशी, किशोर ठाकुर , चानापोशी तुळशीराम नवघरे , चापोशी घनश्याम वडेट्टीवार, मपोशी सोनल आत्राम , सोनी तावडे यांनी कामगिरी केलेली आहे.