कोनसरी लोहखनिज प्रकल्पात अपघात ट्रॅक्टरचालक ठार
चामोर्शी-
तालुक्यातील कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 ऑक्टोबर गुरुवारी 12 वाजून 20 मिनिटांनी घडली.
मिथुन निर्मल मंडल वय 38वर्ष रा बहादूरपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
कोनसरी लोहखनिज प्रकल्पात गिट्टी भरलेला हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टर चालक मिथुन त्याखाली दबला गेला.व तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतक मिथुन मंडल यांच्या मागे पत्नी, तीन मुली व आई वडिल असा परिवार असून या दुर्दैवी घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे







