Home गडचिरोली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कुटुंबासह बालसदन घोट येथील बालकांसोबत...

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कुटुंबासह बालसदन घोट येथील बालकांसोबत दीपावली उत्सव साजरा केला

90

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कुटुंबासह बालसदन घोट येथील बालकांसोबत दीपावली उत्सव साजरा केला

 

गडचिरोली,दि.28: प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीने दीपावली सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतु बालगृहात राहणाऱ्या बालकांना दीपावली सण मोठ्या उत्साहाने साजरा करता यावा यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी आपल्या कुटुंबासोबत यावर्षी दीपावलीचा सन बालगृहातील बालकांसोबत साजरा करण्याकरिता प्रत्यक्षात लोकमंगल अहिल्यादेवी बालसदन घोट येथे भेट देवून दिपावली उत्सवानिमित्त बालकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बालगृहातील बालकांसोबत आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.

बालगृहातील एकूण 15 बालकांना दिवाळी निमित्त, फराळ साहित्य, व इतर आवश्यक वस्तूची कीट वाटप करण्यात आले. सदर उपक्रमामध्ये बालकांना सहभागी करून त्यांच्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव देण्याकरिता मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

सदर कार्यक्रमाला उपस्थीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर,त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रणिता ,दोन मुली निहालिका व राधिका, तसेच बालसदन घोटचे अधिक्षका निर्मला मॅडम, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, सोनी मॅडम, यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून बालकांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

****

Don`t copy text!