गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक बळी

70

गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक बळी

 

गडचिरोली-

गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात मनुष्यहानीचे सत्र सुरूच असून वाघाने बैल चारायला गेलेल्या गुरख्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजगाटा चक येथे दिनांक 3 नोव्हेंबर रोज गुरुवारला घडली.

 

सुधाकर कारू भोयर वय 55 वर्ष रा. राजगाटा चक ता जि. गडचिरोली असे नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुरख्याचे नाव आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली वनविभागाचे पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

या नरभक्षी वाघाने नागरिकांचे जिणे मुश्किल केले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.