आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत सर्वच शिक्षकांना एक स्तर वेतन श्रेणी सुरू ठेवा*

75

*आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत सर्वच शिक्षकांना एक स्तर वेतन श्रेणी सुरू ठेवा*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची ग्रामविकास मंत्री ना. गिरिषजी महाजन यांचेकडे मागणी*

 

*वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मंजूर झालेले शिक्षक यापासून वंचित होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी*

 

 

*दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ गडचिरोली*

 

*जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात सेवारत सर्वच शिक्षकांना एक स्तर वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो परंतु त्याच दूर्गम क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना १२ वर्षानंतर जेव्हा वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मंजूर होतो तेव्हा त्यांना एक स्तर वेतनश्रेणी पासून वंचित करण्यात येते. ही बाब या जेष्ठ शिक्षकांवर अन्याय करणारी असून त्यांना मिळणारी एक स्तर वेतनश्रेणी सुरूच ठेवण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीषजी महाजन यांच्याकडे केली आहे*

 

*शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरीशजी महाजन यांची मुंबई मंत्रालयामध्ये भेट घेतली*

 

*यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना समान न्याय देण्यात यावा अशी विनंती केली. १२ वर्षापर्यंत सेवा देणाऱ्याला वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होणे हा शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचा अधिकार आहे. अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागात सेवा देत असल्याने त्यांना एक स्तर वेतनश्रेणी लागू शासनानेच केली आहे. त्यामुळे वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर जर तो शिक्षक त्याच आदिवासी नक्षलग्रस्त भागात सेवा देत असेल तर त्याची एक तर वेतनश्रेणी काढून घेणे ही अतिशय वेदनादायी बाब आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय करू नये व त्यांनाही इतर शिक्षकांप्रमाणे एक स्तर वेतन श्रेणी सुरूच ठेवावी अशी विनंती ही त्यांनी या भेटीच्या प्रसंगी केली.*