एल आय सी विरोधी आय आरडीएआय चे नविन प्रस्ताव तात्काळ रद्द करा एलआयसी विकास अधिकारी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खा.अशोक नेते यांना निवेदन

75

एल आय सी विरोधी आय आरडीएआय चे नविन प्रस्ताव अन्यायकारक आहे हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी एलआयसी विकास अधिकारी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खा.माननीय अशोकजी नेते यांच्या कडे केली असून या बाबत चे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमाक्षेत्र नियंत्रक (आयआरडीएआय) कडून विमाक्षेत्र विरोधी,पॉलिसीधारक विरोधी, अभिकर्ता विरोधी, एल आय सी ऑफ इंडिया विरोधी अनेक प्रस्ताव देण्यात आले आहेत. हे प्रस्ताव लागू झाल्यास देशातील भारत सरकारची मालकी हक्क असलेली संस्था भारतीय आयुर्विमा महामंडळ(एल आय सी)अनेक दृष्टीने अडचणीत येईल.एल आय सी मध्ये कार्यरत असलेले अभिकर्ता , विकास अधिकारी तसेच कर्मचारी संकटात येण्याची शक्यता या प्रस्तावा मध्ये आहे ,नवीन प्रस्ताव एल आय सी विरोधी पर्यायाने देशविरोधी असल्यामुळे एनएफआयएफडबल्यूआय या राष्ट्रीय संघटनेने संपूर्ण देशातील सर्व लोकसभा राज्यसभा खासदारांना प्रत्यक्ष भेटून विषयाची गंभीरता समजवणारे निवेदन देण्याची मोहीम सुरु केली आहे, त्याच मोहिमेचा भाग म्हणून गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार मा. अशोकजी नेते साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे.

निवेदन देते वेळी नागपूर विभागीय अध्यक्ष विवेक पाचखेडे महासचिव अनुप गुल्हाणे, उपाध्यक्ष मिताली सरकार सहसचिव अमित भलावे, सुशील हिंगे, हेमंत हुसके, सप्निल सावरकर, अतुल खांबाळकर, संदीप वैरागडे, अनिल आत्राम तसेच गडचिरोली ब्रह्मपुरी शाखेचे विकास अधिकारी उपस्थित होते.