मुरलीधाम येथून निघालेल्या पालखी सोहळ्याला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती
*पालखीत सहभागी होऊन केला भक्ती नामाचा गजर*
*श्री मुरलीधाम हरणघाट वरून निघालेली ही पालखी श्री कार्तिक स्वामी महाराज यांच्या चपराळा येथे १४ नोव्हेंबर ला पोहचणार*
*दिनांक १० नोव्हेंबर २०२२ गडचिरोली*
*संत मुरलीधर महाराज यांचे गुरु श्री कार्तिक स्वामी महाराज यांची पालखी हरणघाट वरून चपराळाला निघालेली असून या पालखी सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी हे प्रामुख्याने उपस्थित होते .*
*यावेळी त्यांनी पालखी सोबत पायी मार्गक्रमण करीत भक्ती नामाच्या गजरात रममान झाले.*
*यावेळी श्री दिलीपजी चलाख तालुका अध्यक्ष, सुरेशजी शहा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष ,श्री जयरामजी चलाख, श्री. प्रतीक राठी भा ज यु.मो. अध्यक्ष श्री. भोजराज भगत तालुका महामंत्री, श्री. संजय चलाख यांचे सह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*श्री मुरलीधाम हरणघाट वरून निघालेली ही पालखी श्री कार्तिक स्वामी महाराज यांच्या चपराळा येथे दिनांक १४ नोव्हेंबरला पोहोचणार आहे त्या ठिकाणी नियोजित कार्यक्रमानंतर या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे*