*नवेगाव येथील गोसाई मोहल्यात समाज मंदिराची मागणी गोसावी समाजातील नागरिकांनी दिले आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन
*समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निवेदकांना आश्वासन*
*दिनांक १२/११/२०२२ गडचिरोली*
*गडचिरोली जवळील नवेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गोसाई मोहल्यात या समाजाची संख्या बऱ्या प्रमाणात असून या ठिकाणी समाज मंदिराचे बांधकाम मंजूर करावे व त्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गोसाई समाजातील नागरिकांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.*
*आपण लवकरच या समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकाना दिले*
*नवेगाव ग्रामपंचायतीला आपण आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून गोसाई मोहल्यात देखील विविध विकासात्मक कामे केलेली आहेत . आपल्या मागणीची दखल घेऊन लवकरच या ठिकाणी समाज मंदिर उभे राहील यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदन घेवून आलेल्या समाजातील नागरिकांना दिले.*







