बीड जिल्ह्यातून दोनशे पेक्षा जास्त पञकार मराठी पञकार परीषदेच्या अधिवेशनला उपस्थीत राहणार
बीड —
मराठी पञकार परीषदेच्या पिंपरी चिंचवड येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला बीड जिल्ह्यातून 200 पेक्षा जास्त पञकार उपस्थीती लावणार असून जिल्ह्यात सर्व तालूक्यात सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या 19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे होणाऱ्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी सध्या जोरदार पणे सुरू असून या अधिवेशनात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची जन्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थिती लावणार असून सर्व तालुक्यात याची जोरदार तयारी सुरू आहे बीड जिल्ह्यातून 200 पेक्षा जास्त पत्रकार या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थिती लावतील अशी तयारी सध्या सुरू असून आष्टी, पाटोदा, आंबेजोगाई, परळी, धारूर, केज, माजलगाव, गेवराई, शिरूर, वडवणी, बीड येथे पत्रकारांनी यासाठी नोंदणीही केली असून बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त पत्रकार या अधिवेशनास उपस्थित राहावे व एस एम देशमुख सर यांच्या मागे बीड जिल्ह्यातील पत्रकार एकमुखीपणे उभे असल्याचे सिद्ध करणार आहेत या अधिवेशनाच्या तयारी साठी राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन सोशल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे बीड जिल्ह्यातील विशाल सांळूके सुभाष चौरे विलास डोळसे, जितेद्र सिरसट, दत्ताञय आंबेकर, सुभाष नाकलगावकर, हरीश यादव, विजय आरगडे सचिन पवार, मधुकर तौर, अविनाश कदम, गोकुळ पवार, विनायक जाधव, सय्यद शाकेर, धनंजय आरबणे आदी जण परिश्रम घेत आहेत