ऐकावे थे नवलच मुलगी बघायला आले आणि लग्न करून गेले*

121

*ऐकावे थे नवलच मुलगी बघायला आले आणि लग्न करून गेले*

जालना -दत्तनगर न्युज मोंढा रोड येथील बाळू अप्पा सदाशिव आप्पा भोगावकर यांची द्वितीय कन्या साक्षी ही आयसी आय बँक जालना येथे कार्यरत आहे.

चितळीपुतळी येथील रहिवासी व हल्ली मुक्काम चौधरी नगर जालना येथील हनुमान कारेगावकर यांचे चिरंजीव नामे भूषण हे एचडीएफसी बँक मध्ये कार्यरत आहे या दोघांचा बालाजी आक्वा कंपनीचा हाल मध्ये हळद कुंकू चा कार्यक्रम होणार होता.

वाढती महागाई,पाहुण्याची येजा करण्याची वर्दळ,खर्च विविध लग्नात लागणारे सर्व खर्च्यावर फाटा मारून पारंपारिक व्यवस्थेवर मात करून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा आग्रह सुधाकर आप्पा भोगावकर सुनील आप्पा एखंडे माजलगाव, प्रल्हाद आप्पा देवमण, विजयकुमार महाजन, पत्रकार अभयकुमार यादव यांनी मध्यस्ती करून लग्न कुंकु टिळ्यातच लग्न करण्याची विनंती केली.

वर वधू यांनी चर्चा करुन संमती दिली.

पाच वाजता साध्या पद्धतीने

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न समारंभ संपन्न झाला.

यावेळी बोलतांना अभयकुमार यादव यांनी सांगितले की मुलगी बघायला आले आणि लग्न केले याचा आदर्श सर्वधर्मीयांनी आणि समाजाने घ्यावा असे आव्हान यावेळी केले प्रत्येकाने साध्या पद्धतीने लग्न केल्यास खर्च होत नाही कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही. असे लग्न समारंभ पार पडले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.