गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभाग व आत्मा, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “बचत गटांना कृषी अवजारे वाटप ” समारंभ

73

 

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभाग व आत्मा, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “बचत गटांना कृषी अवजारे वाटप ” समारंभ

 

 

गडचिरोली जिल्ह्रातील शेतक­यांची आर्थिक उन्नती व्हावी व गडचिरोली जिल्हयातील शेतक­यांचे जीवनमान उंचावावे या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन गडचिरोली पोलीस दल, जिल्हा नियोजन विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने मानव विकास योजना 2021-2022 अंतर्गत बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ दि. 25/11/2022 रोजी शहीद पांडु आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पडला.

सदर कार्यक्रमाकरीता गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील 51 बचत गटाचे 500 हुन अधिक लाभार्थी उपस्थित होते. यातील 27 बचत गटांना मळणी यंत्र, 12 बचत गटांना झिरो ट्रिल ड्रिल मशिन, 6 बचत गटांना भात रोवणी यंत्र, 6 बचत गटांना पॉवर विडर या कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. तसेच मधुमक्षिकापालन व पापड लोणचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र व किट देण्यात आले. मानव विकास मिशन कार्यक्रम 2021-2022 अंतर्गत रोजगार निर्मीतीकरीता ‘विशेष योजना’ अंतर्गत कृषी अवजारांचा लाभ मिळवुन देणेकरीता साहीत्याच्या किंमतीच्या 90 टक्के तसेच 75 टक्के सबसिडीवर साहीत्य उपलब्ध करुन देण्यात आले असुन सर्व लाभाथ्र्यांना कृषी यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील शेती व्यवसाय हा पारंपारीक पध्दतीने न राहता अत्याधुनिक पध्दतीने व्हावा व कृषीमध्ये यांत्रिकीकरण व्हावे. यासाठी शेतक­यांना विविध लाभ मिळवुन देण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल प्रयत्न करीत आहे. शेतकरी, युवक-युवती, बचत गट, स्वयंसहायता गट यांनी शासनाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. विकासाभिमुख कार्यक्रमांसाठी गडचिरोली पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या खोटया चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने स्वत:चा व जिल्हयाचा विकास साधावा.

यावेळी मार्गदर्शन करतांना मा. संजय मिना, जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सांगितले की, गडचिरोली प्रशासन या जिल्हयातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या लाभ मिळावा याकरीता प्रयत्न करीत आहे. गडचिरोली जिल्ह्रातील 2,57,955 लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणा­या पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कार्याची प्रसंशा केली.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यत 2,57,955 लोकांना लाभ मिळवुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत 13515 शेतक­यांना कृषी बियाणे वाटप, 1517 शेतक­यांना भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, बदकपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, शेळी पालन इत्यादी प्रशिक्षण व साहीत्याचे किट देवुन रोजगार व स्वयंरोजगाराकरीता आत्मनिर्भर करण्यात आले. 4268 शेतक­यांना शेवगा, पपई, सिताफळ फळझाडे मोफत देण्यात आले. 2208 शेतक­यंाना महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन फार्म भरुन दिले. 9180 शेतक­यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच 176 शेतक­यंाना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला व 4 सहलीमधुन 168 शेतक­यांना कृषीदर्शन सहलीतुन आधुनिक शेतीची माहीती मिळवुन देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमप्रसंगी मा. जिल्हाधिकारी श्री. संजय मीना सा., मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख सा. मा. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. अरविंद टेंभुर्णे, मानव विकास अभियान, मा. डॉ. संदीप क­हाळे कार्यक्रम समन्वय कृषी विज्ञान केंद्र सोनापुर मा. श्री. चेतन वैद्य संचालक बीओआय आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि. महादेव शेलार, पोउपनि. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

।।।।।।।।