गडचिरोली तालुक्यात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*

75

*गडचिरोली तालुक्यात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*

 

*मरेगाव, बेलगाव ,अमिर्झा टोली ,कळमटोला ,भिकारमौशी व आंबेशिवनी येथील२५ १५ निधी अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन*

 

*गडचिरोली तालुक्यात आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नांतून आलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका*

 

*दिनांक. २६/११/२०२२ गडचिरोली*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून २५-१५ अंतर्गत गडचिरोली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून त्याअंतर्गत गडचिरोली तालुक्यातील मरेगाव, बेलगाव ,अमिर्झा टोली ,कळमटोला ,भिकारमौशी व आंबेशिवनी येथील २५ १५ निधी अंतर्गत विकास कामांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.*

 

*याप्रसंगी भाजपा तालुक्याचे अध्यक्ष रामरतनजी गोहने, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शंकरजी नैताम, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, भाजपाचे नेते दिनेश समर्थ, मरेगावच्या सरपंच सौ मालताताई अलाम निनादजी खेवले, भाविका मडावी, बेलगाव येथील बंडूची लठारे, अमिर्झा च्या सरपंच सोनालीताई नागापुरे संजय कोतपल्लीवार, ग्रां प सदस्य अजय नागापुरे, , भिकारमौशी चे ग्रामसेवक पी.पी. घोसेकर , ज्ञानेश्वर गुरनुले, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण नरुले, यांचेसह सरपंच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.*

 

*कोणत्याही गावाला विकासासाठी निधी कमी जाणार नाही आपण अधिकाधिक निधी या गावांच्या विकासासाठी खेचून आणू असे आश्वासन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या भूमीपूजन प्रसंगी ग्रामस्थांना दिले.*