निफंद्रा येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून कॅन्सर ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत
सावली ( प्रतिनिधी )
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून निफ़द्रा येथील कॅन्सर ग्रस्त नागरिक नामे नरेंद्र मुखरू बोबाटे यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली
राज्याचे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवर साहेब हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता निफ़द्रा येथील काँग्रेस चे कार्यकर्ते माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे, आशिष आखाडे यांनी श्री बोबाटे यांच्या तब्येतीची माहिती दिली होती त्तकाल माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सदर बाब माहित होताच आर्थिक मदत पाठीवली
माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आजपर्यंत अनेक रुग्णांना मदत केलेली आहे त्याचीच प्रचिती आज पुन्हा निफ़द्रा येथे बघायला मिळाली जनसेवा ही खरी ईश्वर सेवा असते
सदर आर्थिक तालुका काँग्रेस चे माजी अध्यक्ष बंडू बोरकुटे व आशिष आखाडे यांचे हस्ते देण्यात आली यावेळी अनिल पाटील मशाखेतरी, सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, बंडू बोरकुटे माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष, आशिष आखाडे, खुशाल लोडे संचालक कृषी उत्तपणं बाजार समिती सावली उपस्थित होते
सर्वसामान्य जनतेची सेवा या माध्यमातून विजय भाऊ वडेट्टीवर करीत असतात अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली लोकांना संकट काळात मदत आवश्यक असते ही खरी सेवा असते अशी भावना कॅन्सर ग्रस्त कुटूंबियाणी व्यक्त केली
दरम्यान सदर रुग्णाला पुढील उपचारासाठी काँग्रेस पक्ष तर्फे गाडीची व्यवस्था करून देण्यात येईल अशी माहिती तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे यांनी रुग्णच्या कुटूंबियांना दिली