जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली चे सहा शिक्षक श्री प्रमोद लालाजी रामटेके जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यात नुकतेच शिक्षण विभाग , जिल्हा परिषद गडचिरोली च्या 14 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ला जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोलीच्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आला. कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री प्रमोद लालाजी रामटेके यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय श्री दिपक देवतळे गट शिक्षण अधिकारी , पंचायत समिती एटापल्ली , श्री आरवली सर , गट शिक्षण अधिकारी , धानोरा तसेच श्री शेख सर जी प हाय एटापल्ली , श्री विनय चव्हाण सर मुख्याध्यापक जी प हाय एटापल्ली व शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका व मित्रमंडळी यांना दिले आहे .







