शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात आष्टी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने फडकविला सलग तिसऱ्यांदा भगवा.

119

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात आष्टी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने फडकविला सलग तिसऱ्यांदा भगवा.

15 पैकी 13 जागा जिंकत साधली विजयाची हॅट्रीक.

गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी काल पार पडली.यात गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती व लोकसंख्येनी चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आष्टी ग्रामपंचायतीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात आष्टी शहर विकास आघाडीने 15 पैकी 13 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा आष्टी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला.

वार्ड क्रमांक 1 मधून संतोष बारापात्रे, रुपाली कटकमवार,लता पोरटे विजयी झाल्या तर वार्ड क्रमांक 2 मधून सत्यशील डोर्लीकर, सुनंदा आंबटकर रेशमा फुलझेले, विजयी झाले.वार्ड क्रमांक 3 मधून कपील पाल, विद्या जूनघरे,लाजवंती औतकार, वार्ड न 4 मधून छोटू दुर्गे, वार्ड क्रमांक 5 मधून राकेश बेलसरे, बेबीताई बुरांडे, पूनम बावणे हे उमेदवार विजयी झाले. इतर दोन जागी परिवर्तन पॅनलचे दिवाकर कुंदोजवार व आशिष बावणे हे उमेदवार विजयी झाले.
यावर बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षापासून गावात केलेल्या विकासकांमामुळे व गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावल्यामुळे जनतेने आमच्या वर सलग तिसऱ्यांदा विश्वास टाकून आष्टी शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले.आमच्यावर जनतेनी टाकलेल्या विश्वासामुळे आम्ही गावाच्या विकासासाठी बांधील राहून गावात विकासकामे करण्यावर भर देऊ असे सांगितले.व आष्टीवासीय मतदाराचे आभार मानले.