*कबड्डीच्या माध्यमातून धाडसाला व परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते – माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन*
कबड्डी हा लोकप्रिय सांघिक खेळ आहे. या खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते , निर्णय करण्याची क्षमता वाढते , परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते शारीरिक शक्ती , कौशल्य व स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यासाठी कबड्डी खेळला महत्त्व दिले जाते , कबड्डी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहत असून, असून या खेळाच्या माध्यमातून धाडसाला व परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन महाराष्ट्र आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी केले . चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. येथे जय हनुमान कबड्डी क्लब यांच्या सौजन्याने भव्य प्रौढांचे कबड्डी सामने जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले त्यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला सहउदघाटक म्हणून आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली येथील लेखा अधिकारी बालाजी मेश्राम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे होते तर अध्यक्षस्थानी विसापूर ग्रामपंचायतच्या सरपंचा गौराबाई गावडे ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच काशिनाथ बुरांडे, मारोती सुरजागडे, पोस्ट मास्तर सुनील सातपुते, नरेंद्र लेखामी , गणपत गावडे, बापूजी नरोटे, शंकर हेडो, रमेश सातपुते, राजू बारसागडे, अशोक नरोटे, गणपत गावडे, शंकर हेडो, वनरक्षक बोलीवार, आनंद नरोटे, संजय सातपुते, विजय सातपुते, बंडू नरोटे, अनुप हलदार, सुभाष मेश्राम, गिरीधर कोंदामी, श्रावण नरोटे, सुरज नरोटे, भीमराव मेहनदा, विठोबा कोंदामी, मधुकर मंन्नो, सुरेश मठामी, कमेश पोटावी,भाऊराव पेंदाम,सुखदेव पदा, रवी लेखामी, प्रकाश नरोटे, दीपक झुरे, सुधाकर नरोटे, उमेश नरोटे, चरण लेखामी, पुणेश्वर गावंडे, अशोक नरोटे, सीताराम पोटावी, चरण नरोटे, किशोर नरोटे, साईनाथ मेश्राम, राजू बारसागडे, चंद्रशेखर नरोटे,दशरथ मेश्राम, विजय पदा, राकेश गेडाम, अजय कोंदामी, विठोबा हजारे, रंजित कांदों, भाग्यवान कावळे, आशिष मेश्राम आदी उपस्थित होते.
माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी पुढे बोलतांना म्हणाले की विकासाचे विविध पैलू शिक्षण, क्रीडा, कला , शेती व त्याला पूरक जोडधंदा इत्यादी माध्यमातूनही प्रगती साधता येते विसापूर गावातील नागरिक गावाच्या विकासासाठी सतत धावपळ करीत असतात, या क्षेत्रातील शेतीचा विकास होण्यासाठी चीचडोह बरेज प्रकल्प व क्षेत्रातील १६ गावासाठी तळोधी मोकसा उपसा सिंचन प्रकल्प आमच्या काळात पूर्णत्वास आणला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असे डॉ नामदेव उसेंडी यांनी भाषणातून सांगितले