नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले स्वागत..!!

83

*- वांगेपली ग्राम पंचायतमध्ये आविसचे सरपंच श्री.दिलीप मडावी विजयी..!!*

 

*- नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले स्वागत..!!*

 

📝ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडूनकीच्या मतमोजणीत अहेरी तालुक्यातील वांगेपली ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच श्री.दिलीप मडावी आणि सदस्यांचा माजी आमदार दिपकदादा आत्राम व माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.18 डिसेंबर रोजी तालुक्यातील ०३ ग्रापंचायतीसाठी मतदान झाले.20 डिसेंबर रोजी मतमोजणी झाले असून अहेरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी वांगेपली ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे थेट सरपंच आणि सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले.सरपंच म्हणून श्री.दिलीप मडावी यांचा विजय झाला.निकाल हाती लागताच आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार दिपकदादा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अहेरी शहरात विजयी यात्रा काढली.फटाक्यांचा आतिषबाज करून जल्लोष करण्यात आला.विशेष म्हणजे वांगेपली ग्राम पंचायत अहेरी पासून हाक्केच्या अंतरावर असून सतत राजपरिवाराच्या ताब्यात होती मात्र पाहिजे त्याप्रमाणात विकास झाले नसल्याने मतदारांनी विद्यमान आमदार श्री.धर्मरावबाबा आत्राम व माजी राज्यमंत्री श्री.अंबरीषराव आत्राम यांच्या समर्पित उमेदवाराना नाकारूण आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वातवार विश्वास करत आदिवासी विद्यार्थी संघाचे थेट सरपंच व सदस्य निवडून दिले असून निवडुन आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी पुष्पगुच्छा देवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजाताई करपेत,उपाध्यक्ष श्री.शैलेशभाऊ पटवर्धन,नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,महागावचे ग्राम पंचायत सदस्य श्री.राजेश दुर्गे,वंदना दुर्गे,महेश मडावी,रमेश मडावी,नरेंद्र गरगाम,प्रकाश दुर्गे,व आदिवासी विद्यार्थी संघाचे आजी माजी पद्द्धिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..!!