उदय चंद राजम सडमेक यांचे हृदयविकारच्या झटक्याने दुखद निधन

100

उदय चंद राजम सडमेक यांचे हृदयविकारच्या झटक्याने दुखद निधन

अशोक आईंचवार

शहर प्रतिनिधी अहेरी

आल्लापल्लीत शोकाकूल वातावरण स्व.उदयचंद राजम सडमेक सेवानिवृत व्यवस्थापक कॉपरेटिव्ह बॅंन्क यांच्या पार्थीवावर अग्नी दहन संस्कार . दि. 21/12/2022 ला अचानक हृदय विकार च्या झटक्यानी दूखद निधन झाले असून दि.22/12/2022 ला अफाट जन समूदयाच्या उपस्थीत गोंड समाज स्मशान भूमीवर त्यांना शेवटचे निरोप देण्यांत आलें .या प्रसंगी आजी माजी आमदार व विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी ,मित्रमंडळी , नातेवाईक व खूप मोठा जनसमूदाय उपस्थित होते . शोकसभेचे अध्यक्ष माजी आमदार पेंटा रामा तंलाडी , मा. दिपकदादा आत्राम माजी आमदार , अजय भाऊ कंकडालवार माजी जि. प. अध्यक्ष गड. प्रा. डॉ. रमेश हलामी मा. नामदेवराव आत्राम जेष्ठ नागरीक उपस्थित होते . या वेळी मान्यवरानी आपल्या मनोगतात अहेरी विभागाच्या पंचक्रोशात त्यांचे कार्य हे स्तूत्य पूर्ण होते . त्यांचे मनमिळावू स्वभाव समाज कार्यात अग्रेसर स्थान होते ते जय पेरसापेन समिती आल्लापल्ली चे अध्यक्ष , व विर बाबूराव शेडमाके गृह निर्माण संस्थेचे सचिव असे महत्व पूर्ण कामे त्यांने प्रामाणिक पणे सांभाळले . त्यांच्या नंतर एक मूलगा व मूलगी व लहान लहान नातवंडं व आप्त परीवार आहे . त्यांच्या आत्म्याला पेरसापेन शांती देवो.