कढोली -रामपूर गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोघींना पडली समान मते.
ईश्वर चिट्ठीने या उमेदवारांचे भाग्य उजळले
चामोर्शी- तालुक्यातील कढोली-रामपूर या गटग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्याने अखेर ईश्वरचिट्टी काढून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
कढोली-रामपूर ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र.2 मधील महिला राखीव जागेसाठीच्या उमेदवार सौ प्रतिमा मारोती खोब्रागडे व तिच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ रिताबाई आनंद पुराम या दोघींना 92 अशी समसमान मते मिळाली.यात ईश्वर चिठ्ठीने सौ प्रतिमा मारोती खोब्रागडे हिचे भाग्य उजळले.व तिला विजयी घोषित करण्यात आले. ग्रामपंचायती च्या निवडणुकीत एक-एक मतांसाठी चुरस बघायला मिळते.कढोली ग्राम पंचायतीच्या या निवडणुकीत या दोन उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिट्ठीणे एका उमेदवाराचे भाग्य उजळले तर प्रतिस्पर्धी दुसऱ्या उमेदवाराच्या विजयावर पाणी फेरले असेच म्हणावे लागेल.







