प्राचार्य डॉ.प्रांजल बोगावार यांची सिनेट सदस्य पदी निवड

99

प्राचार्य डॉ.प्रांजल बोगावार यांची सिनेट सदस्य पदी निवड

 

गडचिरोली:-आकार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि आकार बहुउद्देशिया ग्रामीण विकास संस्था, नागपूरच्या संचालिका डॉ. प्रांजल बोगावार यांची श्रीमती नाथीबाई दामोदरजी ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत व्यवस्थापन सदस्य गटातून प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. प्राचार्य डॉ.प्राजंल बोगावार यांच्यासह पाच उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि ते सर्व बिनविरोध निवडून आले. डॉ प्रांजल बोगावार या SNDT महिला विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेल्या विदर्भातील पहिल्या महिला सदस्य आहेत. त्या अभियांत्रिकी विषयात निपुण असुन त्या कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी मिळवल्या आहेत त्या 12 वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत होत्या.आता एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आकार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट फॉर वुमनमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे.त्यांच्या निवडी बद्दल मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवेगाव(मुरखळा)येथील प्रा.संतोष सुरपाम,प्रा,विश्वरत्न मेश्राम, ग्रंथपाल कु वर्षा काटकर,प्रा.मिनाक्षी सुखदेवे,

संचित बोरकर, यांनी अभिनंदन केले आहे