गडचिरोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा पुन्हा एक बळी.
गडचिरोली
गडचिरोली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा बळी गेला आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जेप्रा येथे तेवीस डिसेंबर शुक्रवारी साडे अकराच्या सुमारास घडली.
. . ताराबाई लोनबले वय 60 रा जेप्रा ता जी गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
जेप्रा येथील दोन महिला (माय लेकी) आज रोजी 23 डिसेंबर ला दिभना लगत असलेल्या अमिर्झा रोडवर आपल्या शेत शिवारात सरपन गोळा करायला गेल्या असता, सुमारे 11.30 वाजताच्या दरम्यान असता अचानक जंगला लगत असलेल्या शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला, तेव्हा एकच आरडा ओरड सुरू झाली तेव्हा मुलगी पत्राबाई वसाके वय 50 वर्ष व आई ताराबाई लोनबले वय 60 वर्ष आपले प्राण वाचविण्या करिता इकडे तिकडे पळू लागले पण ह्यात ताराबाई बाबुराव लोनबले वर वाघाने हल्ला चढवला तिच्या नरडीचा घोट घेतला व 2 किलोमिटर अंतरावर जंगल परिसरात ठिकाणी फरफटत नेले.
यावेळी तिच्या मुलीने ह्याची माहिती गावातील लोकांना दिली तेव्हा एकच हंबरडा फुटला व शोधाशोध सुरू केले असता मृत अवस्थेत महिला आढलून आली, याची माहिती वनविभाग व पोलिस स्टेशनला देण्यात आली असता वनविभाग कर्मचारी व पोलिस कर्मचारी घटना स्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला. व शवविच्छेदना करिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
वारनवार वणप्राण्याचे मानवा वरील हल्ले वाढतच चालले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे







