सुकाळा ग्रामपंचायत शिवसेनेच्या चंदेल गटाकडे तर कोजबी येथून तीन सदस्य विजयी
वैरागड( वार्ताहर):- नुकत्याच झालेल्या आरमोरी तालुक्यातील सुकाळा व कोजबी ग्रामपंचायतचा निकाल आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुरेंद्र चंदेल यांच्या गटाकडून सुकाळा येथील सरपंच पदासह तीन सदस्य विजय झाले त्यात सरपंच म्हणून अविनाश कन्नाके यांना जनतेने मताधिक्याने निवडून दिले तर सदस्य म्हणून भारत भैसारे, प्रेमानंद निकोडे दिव्या मोहूरले तसेच कोजबी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन सदस्य निवडून आले यात सर्वसाधारण जागेवरून मनोहर मोरांडे अनुसूचित जाती महिला कविता पाटील अनुसूचित जमाती शशिकला कुमरे ह्या विजयी झाल्या दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांचे सुरेंद्र चंदेल यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले यावेळीउपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, शहर प्रमुख भूषण सातव, नंदू खानदेशकर, रामदास डोंगरवार, माजी सरपंच वैशाली डोंगरवार देवानंद मशाखेत्री, सुनील ताडाम, देवराव चुधरी, सुनील सयाम, वामन कुमरे, पार्वता चुधरी, नामदेव ठाकूर पुंडलिक शिडाम, रामदास गावडे, सुरेश तुमरेटी, जासुंदा ठाकूर बहुसंख्या शिवसैनिक उपस्थित होते.







