उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले दोन वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास विरगोनवार यांनी केली होती मागणी

71

उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले दोन वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास विरगोनवार यांनी केली होती मागणी

 

*आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली दखल*

 

*अहेरी:-* येथील उप जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञासह इतर महत्वाचे पद रिक्त असल्याने प्रसूतीसाठी आलेल्या मातांना व रुग्णांना नाहक त्रास करावा लागत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांना कळताच त्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि त्वरित रिक्तपदे भरण्याची मागणी केली होती.रुग्णांची होत असलेली हेळसांड लक्षात घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून स्त्रीरोग तज्ञ डॉ राहुल महल्ले व भुलतज्ञ डॉ अश्विनी पाटील हे नुकतेच अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयात रुजू झाले आहे.

 

मुलचेरा,अहेरी,एटापल्ली,भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यातील रुग्ण व गरोदर मतांसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे महत्वाचे आहे.पाचही तालुक्यात ग्रामीण रुग्णालय,प्राथमीक आरोग्य केंद्र व तसेच उपकेंद्र असूनही मोठे आजार,अपघात तसेच प्रसूतीसाठी अहेरी येथे आल्याशिवाय पर्याय नाही. मात्र,सध्याच्या परिस्थितीत याठिकाणी भुलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,दंत शल्य चिकित्सक आणि नेत्र शल्य चिकित्सक सारखे पद रिक्त आहेत. अश्यावेळी अहेरीत उपचार न मिळाल्यास जिल्हा मुख्यालय किंव्हा चंद्रपूर गेल्याशिवाय पर्याय उरले नव्हते.

 

सर्वसामान्य नागरिकांना हे परवडणारे नसून आदिवासीबहुल अहेरी उपविभागातील रुग्णांना याच ठिकाणी योग्य उपचार मिळावं या उदात्त हेतूने श्रीनिवास विरगोनवार यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागील महिन्यात रिक्तपदे भरण्याबाबत मागणी केली होती.धर्मराव बाबा आत्राम यांनी त्वरित या गंभीर बाबीची दखल घेत पाठपुरावा करून ही मागणी रेठुन धरली.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.विशेष म्हणजे आता गरोदर मतांची हेळसांड थांबणार आहे.डॉ.अनंत जाधव,डॉ अश्लेषा जाधव यांचे नोव्हेंबर महिन्यात इतरत्र स्थानांतरण झाल्याने तेंव्हापासून हे पद रिक्त होते.जाधव दाम्पत्यामुळे अहेरी उपविभागातील प्रसूतीसाठी येणारी एकही गरोदर मातेला रेफर केले जात नव्हते. मात्र,त्यांच्या स्थानांतरणानंतर रेफर करण्याची पाळी आली होती.त्यांचे काम कौतुकास्पद होते हे विशेष.

 

*उर्वरित रिक्तपदे लवकरच भरणार*

याठिकाणी बालरोग तज्ञ,दंत शल्य चिकित्सक आणि नेत्र शल्य चिकित्सक सारखे आणखी काही पदे रिक्त असून याबाबत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा पाठपुरावा सुरू असून लवकरच उर्वरित रिक्तपदे भरण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांनी दिली.