सण 2021-2022 चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने श्री विनीत बंडू पद्मावार सन्मानित

65

सण 2021-2022 चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने श्री विनीत बंडू पद्मावार सन्मानित

 

 

 

 

अहेरी.. समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा देणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणाचा यथो तिथं सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले सण2021-2022 पासून राज्य पुरस्काराचे निकष बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात येत आहे भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयन गुडा शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री विनीत बंडू पद्मावार सरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात सेवा देऊन हे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व शिक्षक वृंद व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे