नक्षल्यांनी केली गाव पाटलाची हत्या

0
71

गडचिरोली, ता. ३० : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत तुमरकोठी येथील घिसू मट्टामी नामक ५० वर्षीय गावपाटलाची नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री गोळ्या झाडून हत्या केली.

 

घरी झोपेत असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी घिसू मट्टामी यास उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर त्याची दोन गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतदेहावर नक्षल्यांनी ठेवलेल्या चिठ्ठीत घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचे म्हटले आहे. मात्र, मृतक घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, तर तो नक्षल्यांच्या ग्रामरक्षक दलाचा सदस्य असण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले.

 

त्यामुळे ही हत्या नक्षल्यांच्या अंतर्गत वादातून झाली असण्याची शक्यता आहे. दीड महिन्यापूर्वी ८ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यातील झुरी गावचा रहिवासी दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी नामक आपल्या सहकाऱ्याची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्याचप्रकारे घिसू मट्टामी याचीही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here